आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Suicide Of A Student Studying In The Final Year Of 'FTI' Excitement After The Body Was Found In A Rotten State, The Police Found A Suicide Note

'FTI' आत्महत्येचे गूढ:विद्यार्थ्याच्या खोलीच्या आवारात माशा, दुर्गंधी; विद्यार्थ्याला वैमानिक असल्याचा व्हायचा भास

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूटमध्ये (एफटीआय) आज सकाळी अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अश्विन अनुराग शुक्ला (वय 32) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ताे मूळचा साल्वादाेर नाॅर्थ गाेवा याठिकाणचा रहिवासी हाेता. त्याच्या आत्यमहत्येमागे नेमके काय कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, विद्यार्थ्याबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

विचित्र भास

अश्विन शुक्ला असे गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन आठवड्यांपूर्वी आपण वैमानिक असल्याचा भास त्याला झाला होता. विमान चालवताना आपले विमान क्रॅश झाले, असा भास झाल्याने त्याने एकावर हल्लादेखील केला होता. असे विचित्र भास होत असल्याने त्याच्यावर ससून रुग्णालात उपचार सुरु होते. त्या अनुषंगाने तो औषधेही घेत होता. या मानसिक आजारातून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने काही सुसाईट नोट लिहिली होती का? याचाही शोध पोलिस घेत आहेत.

खोलीच्या आवारात माशा

एफटीआय परिसरातील वसतिगृहातच अश्विन राहत होता. वसतिगृहातील त्याच्या मित्रांनी त्याला मंगळवारी शेवटचे पाहिले होते. गुरुवारपासून त्याच्या खोलीतन दुर्गंधीचा वास येत होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात माशा त्याच्या खोलीच्या आवरात फिरत होत्या, त्यामुळे मुलांना अश्विनच्या आत्महत्येचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्याचा मृतदेह अग्निशामक दलाच्या मदतीने ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शववि्छेदनासाठी पाठवला. त्याचे आई-वडील दोघेही गोवा येथे डॉक्टर आहेत.

अश्विन मूळचा गोव्यातील येथील रहिवासी होता.
अश्विन मूळचा गोव्यातील येथील रहिवासी होता.

मृतदेह सडलेला

अश्विनने आत्महत्या कधी केली, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. याबाबत डेक्कन पाेलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. डेक्कन पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाेलिस नियंत्रण कक्षास लाॅ काॅलेज रस्त्यावरील एफटीआय महाविद्यालयात मुलांच्या जुन्या हाॅस्टेलमध्ये आत्महत्येसारखा प्रकार घडला असल्याचा फोन आला. खाेलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यानुसार डेक्कन पाेलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ठिकाणी बी ब्लाॅक रुम क्रमांक एस-12 च्या दरवाजाच्या वरील खिडकीतून पाेलीसांनी आत डाेकवून पाहिले असता सदर खाेलीत राहणाऱ्या आश्विन शुक्ला या विद्यार्थ्याने खिडकीला नायलाॅनच्या दाेरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पाेलिसांनी अग्नीशामक दलाच्या जवनांना घटनास्थळी बाेलवुन घेत आतून बंद असलेला दरवाजा उघडून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

सुसाई़ड नोटचा शोध

पोलिसांनी सांगितले, बाजूच्या खाेलीत राहणाऱ्या मुलांनी अश्विन शुक्ला यास शेवटचे मंगळवारी पाहिल्याचे सांगितले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कोणती सुसाईट नाेट लिहिली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिस सुसाईड नोटचा शोध घेत आहेत. त्यामुळे नेमकी त्याने आत्महत्या काेणत्या कारणास्तव केली याचा उलगडा अजूनतरी झालेला नाही. याबाबत अधिक तपास डेक्कन पाेलिस करत आहे.

आत्महत्येपूर्वी अश्विनने सुसाईड नोट लिहिली होती का? याचा तपास पोलिस करत आहेत.
आत्महत्येपूर्वी अश्विनने सुसाईड नोट लिहिली होती का? याचा तपास पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...