आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकाची आत्महत्या:5 जणांवर गुन्हा दाखल; 61 लाखांची केली होती फसवणूक

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमीन व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाण वेळी जमीन मालकास हात उसने दिलेले 61 लाख 50 हजार रुपये त्याने परत न केल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी व्यवसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकारणी पोलिसांनी पाचजणांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दाेघांना अटक केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.

अजयकुमार विरदीचंद बेदमुथा (वय-46, रा.येरवडा, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात त्यांची पत्नी प्रतिमा बेदमुथा (40) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी हेमंत मोहनलाल भंडारी (60) व मोनीश हेमंत भंडारी (22, दोघे रा.खेड, पुणे) या दोन आराेपींना अटक केली आहे. त्यांच्यासह आरती मोनीश भंडारी, (28), हर्षल मदनालाल बलदोडा (45) व किरण महादू पवार (27) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा सन 2018 ते 24 ऑगस्ट 2022 यादरम्यान घडला आहे.

गुन्हा दाखल

अजयकुमार बेदमुथा हे शेअर बाजारात गुंतवणूक करत होते. त्यांनी भंडारी यांच्यासह इतर आराेपींना जमीन व्यवहाराकरिता 61 लाख 50 हजार रुपये वेळोवेळी जमीन विसारापाेटी दिलेले होते. परंतु आरोपींने ते पैसे त्यांच्या स्वत:जवळच ठेवले. त्याची मागणी करुनही ते परत करण्यात आले नाही. तसेच बेदमुथा यांच्या नावावर असलेली स्वीफ्ट कार ही हेमंत भंडारी व मोनीश भंडारी यांनी कामासाठी दोन ते तीन दिवसाकरिता घेतली. परंतु ती परत केली नाही.

गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक संकटात सापडलेल्या अजय कुमार बेदमुथा यांनी 14 जुलै 2022 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी सिलींग फॅनला नायलॉनचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आराेपींनी त्यांना संगनमताने कट रचून फसवणूक करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस आळेकर करत आहे.

बातम्या आणखी आहेत...