आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करण्याचे ठरवून विवाहास नकार:तरुणीची विषारी रसायन पिऊन आत्महत्या; लग्न नोंदणी संकेतस्थळावर ओळखीनंतर केला बलात्कार!

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर ओळख झाली, नंतर भेट आणि लग्न करण्याचेही ठरले. पण तरुणाच्या मनात वेगळाच मनसुबा होता, त्याने तिच्यावर बलात्कार केला. यामुळे हतबल झालेल्या तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली.या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शंतनू संजय साळुंखे (रा. हेरंब को-ऑप सोसायटी, टिळकनगर, कुर्ला, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या भावाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरुणीने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली हाेती. संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून साळुंखेने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा साळुंखेने तिला नकार दिला. फसवणुकीमुळे तिने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याचे तरुणीच्या भावाने फिर्यादीत सांगितले आहे.

दरम्यान, तरुणीने विषारी ओैषध प्याल्यानंतर तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिने पोलिसांकडे जबाब ही दिला होता. मृत्यूपूर्व जबाब तसेच तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर साळुंखेच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस चव्हाण याबाबत पुढील तपास करत आहेत.

वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

पुणे अहमदनगर रस्त्यावरील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे एका कंत्राटी पद्धतीने ऊर्जा विभागाचे काम करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धनंजय बापूसाहेब दरेकर (वय 54 )असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी धनंजय दरेकर हे सणसवाडीतील खंडोबा माळ येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या विद्युत विभागाच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्युज टाकण्याकरता गेले होते. काम करत असतानाच त्यांचा करंट लागल्याने दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृतची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...