आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत राहून मराठी संस्कृती फुलवण्यात मोठे योगदान देणारे महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख (७४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. सांगलीहून अमेरिका गाठल्यानंतर कर्तृत्व गाजवणारा चेहरा अशी देशमुख यांची ओळख होती.
सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेलेल्या तरुणांमध्ये देशमुख यांचे नाव प्रामुख्याने घेतले गेले. सांगली ते फ्लोरिडा असा त्यांचा प्रवास होते. मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी देऊन १९९४ पासून महाराष्ट्र फाउंडेशनचे मराठी साहित्य पुरस्कार ही योजना सुरू केली.
सुनील देशमुख हे अमेरिकेमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्वांत जुन्या ‘सियारा क्लब’ या संस्थेचे सक्रिय सभासद होते. महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील ‘टाइम स्क्वेअर’मध्ये हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत ‘फुल वीक सॅल्यूट’चा सन्मान मिळाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.