आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिमानास्पद:सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार, 229 चर्चासत्रांमध्ये तब्बल 546 वर विचारले प्रश्न

प्रतिनिधी| पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.

संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या प्रख्यात इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. या अहवालात संसदेतील नोंदींनुसार खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या. विद्यमान १७ व्या लोकसभेचा अहवाल आहे. यात २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, प्रश्न किती विचारले व त्यांची सभागृहात उपस्थिती किती होती, अशी सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणी केली. खासदार सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या.