आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकनाथ- देवेंद्र यांचे 'ईडी 'सरकार असल्याचे फडणवीस सांगतात. मात्र, हे ' ईडी 'सरकार जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेत आले की, विरोधकांसोबत सूडाचे राजकारण करण्यासाठी ते सत्ताधाऱ्यांनी तपासून पाहावे. विरोधकांना सातत्याने त्रास देण्याचे राजकारण सत्ताधारी सातत्याने करत आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला.
सुप्रिया सुळेंनी पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
सत्ताधारी सूड उगवत आहेत
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत येऊन चार महिने झाले आहे. नागरिकांच्या दृष्टीने सरकार हे मायबाप असते मात्र सध्याचे सत्ताधारी हे जनतेची सेवा न करता, सुडाचे राजकारण करीत आहे.
प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य
सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्य बाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येकास जे मत वाटते ते मांडू शकतात.
उर्फी जावेदवर सुप्रिया बोलल्या
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मॉडेल उर्फी जावेद हिच्या वेशभूषा वरून सध्या जो वाद सुरू आहे त्याबाबत सुळे म्हणाल्या, माझी सर्व पक्षांना विनंती आहे की, गलिच्छ राजकारणासाठी कोणत्या महिलेचा अपमान करण्यात येऊ नये. कारण ती कोणाची बहीण, आई, मैत्रीण आहे. त्यासाठी कोणत्या महिलेची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येऊ नये.
सामाजिक परंपरेला गालबोट नको
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या राज्यास सांस्कृतिक , सामाजिक परंपरा आहे त्याला गालबोट लागू नये याची दक्षता बाळगावी. संपूर्ण देश आपल्याकडे आदर्शने इतके वर्ष पाहत आहे. नागरिकांच्या आयुष्य मध्ये चांगला बदल घडविण्यासाठी लोकप्रतिनिधीं मतदार निवडून देतात.आज राज्यात महागाई, बेरोजगारी , वीज तुटवडा समस्या हे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.