आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Supriya Sule Statment After Dehu Program | It Is An Insult To Maharashtra Not To Allow Deputy Chief Minister Ajit Pawar To Speak At The Dehu Program

सुप्रिया सुळेंनी नोंदवला आक्षेप:देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, तिथे अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत सुळेंनी व्यक्त केली. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

पंतप्रधान मोदींकडे अजित पवारांनी भाषणाची मागणी केली होती. मात्र, त्या कार्यक्रमात फडणवीस यांना बोलण्याची संधी देण्यात आली आणि अजित पवारांना बोलू दिले नाही. मोदी पुण्यात दाखल होताच अजित पवार त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले होते.

हे अयोग्य आहे

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. ज्या जिल्ह्यात पंतप्रधान जातात तेथील पालकमंत्र्याला त्यांच्यासोबत राहावे लागते तो या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे अजित दादांचे जागे हे कर्तव्य आहे. पण त्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू न देणे हे मला अयोग्य वाटले.

हा दादांचा अधिकार

अजित पवारांच्या कार्यालयाने पीएम ऑफिसला विनंती केली होती की, अजित पवारांना भाषण करायचे आहे. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे हे त्यांचे अधिकार आहे. मात्र, पीएम कार्यालयाने अजित दादांच्या भाषणाला परवागणी दिली नाही, असे अतिशय गंभीर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

म्हणून बोलण्याची संधी मिळाली नाही

देहू संस्थानकडून संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या संपूर्ण सोहळ्यात भाजप नेत्यांची छाप पाहायला मिळाली. स्टेजवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तुषार भोसले, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मात्र, जेव्हा फडणवीसांचे भाषण झाले त्यानंतर सुत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने थेट पंतप्रधान मोदींना भाषण करण्यासाठी सांगितले. त्यामुळे अजित पवारांना भाषण करण्यात आले नाही.

मोदींनी माफी मागावी

सुप्रिया मतांशी मी सहमत आहे. प्रधानमंत्री हे पद संवैधानिक आहे त्या प्रोटोकॉलनुसार स्थानिक पालकमंत्री म्हणजे अजित पवारांना त्यांच्या स्वागतासाठी जाणे अपेक्षित आहे आणि ते गेले देखील. मात्र, असे असताना त्या प्रोटोकॉलमध्ये संवैधानिक पदावर मोदी आणि अजित पवार देखील आहेत. अजित पवारांना जर जाणिवपूर्वक डावलले असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या बद्दल देशाचे पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

अपमान मानण्याचे कारण नाही

दरम्यान मिटकरी यांनी केलेल्या मागणीवर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे हास्यास्पद आणि बालिशपणाचे विधान आहे. अजित दादांना बोलायची संधी दिली असती तर आनंदच झाला असता. मात्र, पंतप्रधानांचे एक शेड्यूल असते त्यानूसार वेळापत्रक ठरले असेल. त्यामुळे अजित दादा बोलले नाही म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असे काही मानण्याचा कारण नाही. अजित दादा सन्मानाने मोदींच्या बाजूलाच उपस्थित होते. महाराष्ट्राचा आणि वारकऱ्यांचा सन्मान करण्यासाठीच ते महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये.

बातम्या आणखी आहेत...