आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिष्यवृत्ती:सूर्यदत्तातर्फे उच्च शिक्षणासाठी लाइफलॉंग लर्निंग उपक्रमांतर्गत 75 लाखाची शिष्यवृत्ती जाहीर

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने विविध कंपन्यात कार्यरत नोकरदार, 'सूर्यदत्त'मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक व कोरोनामध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील व्यक्ती, पुण्यातील स्वयंसेवी संस्थात राहणारे व अनाथ विद्यार्थी यांना पदवी व पदव्युत्तर पदवी आणि पदविका अशा उच्च शिक्षणासाठी लाइफलॉंग लर्निंग उपक्रमांतर्गत 75 लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती 'सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, स्वातंत्र्याची 75 वर्षे अर्थात आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह द्वारे 'सर्वांसाठी शिक्षण' अंतर्गत ही75 लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठांशी संलग्नित अर्धवेळ किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा अल्प कालमर्यादेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवार-रविवार शिकता येतील अशा अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. दहावी, बारावी व पदवीनंतरचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

यासह यंदा सूर्यदत्त संस्थेत शिकणाऱ्या पालकांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असून, या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांना, तसेच निवृत्त झालेल्या व्यक्तींना बराचसा वेळ शिल्लक असतो. त्यांना काही अभ्यासक्रम शिकता येतील. तसेच त्यांना आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल. पोलीस व पत्रकारांसाठीही काही अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले असून, त्यांना स्वतःला अद्ययावत करण्यासाठी शिक्षण घेता येणार आहे. त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. गृहिणींना घर सांभाळून शिकता येणारे अनेक अभ्यासक्रम विविध विद्यापीठांच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोरोना काळात ज्यांचे पती किंवा पत्नी मृत पावली असेल, अशा व्यक्तींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांना पुढील शिक्षण घेऊन पुन्हा करिअर करता यावे, यासाठी शिष्यवृती उपलब्ध करून दिली जाणार आहे,असे प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले.

या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे. कंपन्यांच्या सीईओ/एचआर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नावे 10 जुलैपर्यंत पाठवावीत. तज्ज्ञ समितीकडून आलेल्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांची अंतिम यादी 10 ऑगस्ट 2022 नंतर जाहीर होतील. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...