आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:सूर्यदत्त शिक्षण संस्था देणार 75 लाखांची शिष्यवृत्ती

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन उच्च शिक्षणासाठी ७५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहे. यात विविध कंपन्यांचे कर्मचारी, ‘सूर्यदत्त’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पोलिस, पत्रकार, लष्करातील कर्मचारी आणि कोरोनाग्रस्त कुटुंबातील सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांना उच्च शिक्षणासाठी ७५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही माहिती सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व अध्यक्ष संजय चोरडिया यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रा.डॉ. सुनील धारीवाल, प्रशांत पितळिया उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्ताने सूर्यदत्ता ग्रुप ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहे. सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट आणि सीएसआर इनिशिएटिव्हअंतर्गत ‘सर्वांसाठी शिक्षण’ या उपक्रमांतर्गत ही मोहीम राबवणार. या शिष्यवृत्तीचा लाभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांशी संलग्न अंशकालीन किंवा दूरस्थ शिक्षण, अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना घेता येईल. दहावी, बारावी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिकणाऱ्या आणि अर्धवेळ नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे. कंपन्यांच्या सीईओ, एचआरने त्यांच्या कर्मचाऱ्यांची नावे १० जुलैपर्यंत पाठवावीत. तज्ञ समितीकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्यांची अंतिम यादी १० ऑगस्ट २०२२ नंतर जाहीर केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...