आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मवीरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटत आहे. सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे.
जबाबदार राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते केंद्र आणि राज्यातील मंत्री, सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाचा मी राजीनामा देत असल्याचे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी सांगितले आहे.
काय म्हणाल्या अंधारे ?
अंधारे म्हणाल्या, समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या सत्सत विवेक प्रश्न आहे मात्र माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती. व सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती.
परंतु ही समिती उच्चतंत्र शिक्षण मंत्रालयाच्याच अखत्यारीत येते आणि जर याच खात्याचे मंत्री यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके हिन दर्जाचे विचार असतील तर समितीतील सदस्य पदापेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्यासाठी लाख पटीने महत्त्वाचा आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मी या समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.
मी दिलगिरी व्यक्त करतो - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आपली बाजू मांडताना सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महत्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्याबाबत मला सदैव आदर आहे. त्यांच्या आदर बाबत मला कोणी शिकवू नये. तो माझ्या मनात असून श्रद्धा ही आहे. भीक मागून मी माझी संस्था उभी केली असा वाक्य प्रचार त्याकाळी प्रचलित होता. वर्गणी, सी एस आर हे शब्द त्याकाळी नव्हते. मी भीक शब्द वापरल्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मी छोट्या मनाचा माणूस नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.