आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा लागलेला निकाल हा ऊर्जादायी आहे. भाजपला हरवणे अशक्य नसून भाजपच्या असुरी सत्तेला चाप लावण्याचे काम या निवडणुकीच्या माध्यमातून झाल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रित आले तर भाजपच्या असुरी सत्तेला रोखता येऊ शकते हा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून आलेला आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये हाच ट्रेंड आपल्याला आगामी काळात दिसून येईल असा विश्वास शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
अंधारे म्हणाल्या, नाशिक शिक्षक मतदारसंघात दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असताना, नागपूरमध्ये घरची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गमावली आहे. नाशिक मध्ये सत्यजित तांबे यांना महाविकास आघाडीतील काही लोकांनी मदत केली असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी लावला आहे त्याबाबत बोलताना अंधारे म्हणाल्या,
एका व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून निष्कर्ष काढता काम नाही. महविकास आघाडी मजबूत असून आगामी काळात एकत्रित वाटचाल करेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना संताजी धनाजी यांच्याशी करत ते वेगाने कामे करत असल्याने विरोधकांना धडकी भरत असल्याची भावना व्यक्त केली.त्याबाबत त्या म्हणाल्या, ते जर संताजी- धनाजी असतील तरी फडणवीस यांनाच बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना ही महत्व दिसून येते. त्यामुळे बावनकुळे हे नेमके कोण आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन पायंडा गरज नाही
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिलांना पुरुषांनी ओवाळले पाहिजे आणि नवीन पायंडा घातला पाहिजे असे मत व्यक्त केले. याबाबत अंधारे म्हणाल्या,नवीन पायंडा घालण्याची काय गरज आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना दरवर्षी वटपौर्णिमेला त्यांचे पती ओवळतात, आमचे भाऊ आम्हाला नेहमी ओवळत आहे. फुले -शाहू -आंबेडकर हे भाजप सोडून इतर पक्षांनी जपले आहे. भाजप सातत्याने क्रांतिवीर यांचा अपमान करत आहे. त्यांना आपली पुरोगामी व्यवस्था मोडीत काढून हेडगेवार, गोळवलकर यांना पुढे आणण्याचे षडयंत्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.