आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेन प्रवेश:सुषमा अंधारे, कॅप्टन सुर्वेंचा शिवसेनेत प्रवेश; शिवसैनिकांना उमेद देण्यासाठी पक्षप्रवेश : अंधारे

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुराेगामी नेत्या व काेरेगाव भीमा प्रकरणातील एक तक्रारदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. अनेक वर्षे हिंदुत्वविराेधी भूमिका मांडणाऱ्या अंधारे अचानक शिवसेनेत प्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अंधारे म्हणाल्या की, ‘शिवसेनेत प्रवेश करून मला काय मिळणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मला काय द्यायचे आणि काय घ्यायचे हा मुद्दा नसून मला शिवसेनेकडून काही मिळावे, अशी अजिबात अपेक्षा नाही. आता फक्त माझ्या डाेक्यात एकच गाेष्ट आहे, ती म्हणजे मी शिवसेनेला काय देऊ शकते. सैरभैर झालेल्या शिवसैनिकांत एक नवीन उमेद जागवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपचे हिंदुत्व हे अभिनेत्री कंगना, केतकी चितळे, नूपुर, तुषार भाेसले प्रवृत्तीचे, चिथवाणी देणारे, भाेंगे उतरवणारे, भाेंग्यावरून सुपारी देणारे आहे.

खा. भावना गवळींसमोर कॅप्टन सुर्वेंचे पुन्हा आव्हान
वाशिम| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खा. गवळी यांच्यासमोर प्रशांत सुर्वे यांचे आव्हान राहील. वाशिम तालुक्यातील पारडी आसरा येथील मूळचे रहिवासी असलेले प्रशांत सुर्वे हे वैमानिक होते. गवळींसोबत २००४ मध्ये त्यांचा विवाह झाला व २०१३ मध्ये घटस्फोट झाला. सुर्वेंनी २०१४ लोकसभा निवडणुकीत वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.

बातम्या आणखी आहेत...