आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी सदानंद कदम यांच्यावर झालेली कारवाईत. किरीट सोमय्यांचा मोठा सहभाग होता. किरीट सोमय्या हे अतिक्रमण आणि ईडी विभागाचे कर्मचारी आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर हल्ला केला.
भाजपात गेल्यावर कारवाईपासून वाचता येते
सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपचे स्वच्छतादूत किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले. ते लोक भाजपमध्ये गेल्यावर किंवा त्यांच्यासोबत गेल्यावर स्वच्छ होतात का, भाजपकडे काही मशीन आहे का. यात विशेष करून प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव यांच्यावर किती प्रकारचे आरोप सोमय्या यांनी केले. आता त्यांच्यावर कारवाई नाही. म्हणजेच भाजपमध्ये गेल्यावर सर्व माफ होते. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
PM मोदी देशाचे की भाजपचे- अंधारे
केंद्रसरकारच्या विविध तपास यंत्रणांकडून देशभरातील प्रमुख विरोधकांच्या घरावर धाडी टाकल्या जात आहेत. यासंदर्भात देशातील 18 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले. परंतू त्या पत्राचे उत्तर देखील PMO कार्यालयाकडून देण्यात आलेले नाही. पंतप्रधान हे देशाचे असून ते उत्तर देणे त्यांचे काम आहे. तरी देखील त्यांच्याकडून विरोधकांच्या पत्रांना उत्तर दिले जात नाही. त्यामुळे हे देशाचे पंतप्रधान
भाजपकडे ब्लॅकचे व्हाईट करण्याचा यंत्र आहे का
सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपकडे ब्लॅकचे व्हाईट करण्याचा यंत्र आहे का, भाजपकडे गेल्यावर सर्व आरोप झालेले लोक स्वच्छ झाले आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केला. एकवेळ नाही तर तब्बल 22 वेळा पत्रकारपरिषद केले. अडसूळांवर यांच्याविषयी 6 पत्रकार परिषद घेतले. यशवंत जाधव यांच्या 16 पत्रकार परिषद घेतल्या. शेकडो ट्विट केल्या. त्यामुळे आता काय झाले.
सदानंद कदम यांच्यासाठी 11 वेळा भेट
खेड प्रकरणात सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाली. किरीट सोमय्यांनी खेड दापोलीत 11 वेळा भेट देतात. ते का ईडी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आहेत का, अनिल परब यांच्याविरोधात कितीदा पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.