आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Sushma Andhare On Ajit Pawar Over Obscene Remarks By Eknath Shindes Ministers | Sharad Pawar | Uddhav Thackeray Satara Pune News

चुकत असेल तर कान पकडा म्हणत..:सुषमा अंधारेंनी शरद पवारांकडे केली अजितदादांची तक्रार; पाढा वाचताना अश्रू अनावर!

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''माझ्याविरोधात आमदार अश्लील टिप्पणी करतात. पण कोणत्याच पोलिस ठाण्यात तक्रार लिहून घेतली नाही. सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवायला हवा होता; पण विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता. मी केलेले मेसेज काही नेत्यांनी चार महिन्यांनी बघितले; पण तुम्ही मला एका फोनवर लगेचच प्रतिसाद देत कुटुंबप्रमुखासारखे आपण म्हणणे ऐकून घेतले'' असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना अश्रू अनावर झाले.

'तो' किस्सा सांगताना डोळा पाणी..

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसढसा रडल्या.

राजकारणाचा विषय नाही

सुषमा अंधारे म्हणाल्या, ''येथे राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणे गरजेचे आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता.''

..तर कान पकडा

सुषमा अंधारे म्हणाल्या, ''माझे चुकत असेल तर तुम्ही कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी तुमच्याकडे हक्काने बोललेच पाहिजे. शरद पवारांना लोक आधारवड म्हणतात. त्यांनी राजीनामा दिल्यावर मी जे पत्र लिहिले होते तेच मी वाचणार आहे.

संजय राऊतांनी या पत्राची प्रिंट काढून पवारांना दिल्याचे मला सांगितले गेले. मात्र, हे पत्र मी पुन्हा एकदा वाचून दाखवले पाहिजे.

काय आहे पत्रात?

सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच पत्र वाचले त्यात त्यांनी शब्द उच्चारले की, ''खरेतर मी शरद पवार यांना लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा माझी निश्चितच नाही. मात्र, केवळ पक्ष म्हणून नाही, तर महाराष्ट्रातील बहुजन, उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज जाण असणाऱ्या कुणालाही पवारांचा राजीनामा मानवणार नाही.

पवारांमुळे माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, ''मी सभागृहात सांगू शकणार नाही की शरद पवारांनी माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केलं आणि काय नाही. शरद पवारांमुळे माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसतं आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले. मात्र, मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला आणि शरद पवारांपर्यंत माहिती पोहचवली. माझ्या एका फोननंतर पुढील 6 तासात मी दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते.''