आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोश्यारींना राज्यपाल असल्याचा विसर:शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात द्वेष; सुषमा अंधारेंचा आरोप

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली एक-एका नेत्यांकडून सुनियोजित पद्धतीने महापुरुषाबद्दल हे बोलवून घेतले जात आहे. हे भाजपचे षंडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत कमालीचा आकस, राग, द्वेष आहे, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष खरगे जेव्हा मोदींना रावण म्हणाले तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया द्यायला पुढे आले. कारण तेव्हा त्यांना भिती होती असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. यावेळी काढण्यात आलेल्श मोर्च्याच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या.

अंधारे काय म्हणाल्या?
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. आमच्या 40 चुकार बांधवांनी त्यांना बोलायला थांबवले नाही, आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्यांना अजितबात बोलायला थांबवले नाही. यामुळेच प्रसाद लाड यांनी लाडात येऊन आमच्या डोक्यावर प्रसाद वाटला, यानंतर मंगलप्रभात लोढा यांना महाराजांबद्दल वक्तव्य केले असे म्हणत भाजपवर जोरदार टीका केली आहे. पलावामधील शेअर सत्तेतील कुणाकुणाला जातात? आणि ते शांत का बसतात हे न समजण्याइतपत आम्ही दुधखुळे नाही असा टोला सुषमा अंधारेंनी राज्य सरकारला लगावला आहे.

यापुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, भाजपच्या नेत्यांकडून जाणूनबूजून महारपुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत. भाजपला ऐकायचे नसेल तर आम्ही असं समजू की भाजप महापुरुषांच्या विरोधात आहे. 17 मार्चला आमचा सर्वपक्षीय मोर्चा मुंबई येथे आहे. आम्ही सर्व महापुरुषांच्या सन्मानार्थ एकत्र येणार आहोत. पुण्यातून या बंदला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...