आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ जनरल आरक्षण खिडकीसमोरील मोकळ्या जागेत प्लॅटफाॅर्मवर प्रवेश करण्याच्या ठिकाणी तीन जिलेटिनच्या कांड्यांसारख्या दिसणाऱ्या संशयास्पद वस्तू शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिस व पुणे पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकास संबंधित संशयास्पद वस्तूची मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने पाहणी करत ते पार्सल बी.जे. मेडिकल मैदानावर नेऊन त्याचा स्फोट घडवला. त्यात फटाके असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेस्थानकावरील प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक, लोहमार्ग पुणे व पुणे शहर, अग्निशामक, रुग्णवाहिका तसेच सर्व संबंधित विभाग घटनास्थळी दाखल झाले. संशयित वस्तूची तपासणी केली असता, त्यात कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले. त्यात जिलेटिन कांड्या नव्हत्या व त्यांना कोणताही पाॅवर साेर्स जोडलेला नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही.
घटनेची तपासणी करणार
पुणे लोहमार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील म्हणाले, पुणे रेल्वेस्टेशन व परिसराच्या अधिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक व नाशक पथक व श्वान पथक यांच्याकडून तपासणी करण्यात आलेली आहे. संशयित तीन नळकांड्यांत माेठाया फटाक्यांची लेबल काढून त्यात फटक्याची स्फोटके ठेवण्यात आली होती. नेमका हा प्रकार कोणी केला व त्याचा उद्देश काय होता, याबाबत सखाेल तपासणी करण्यात येत आहे. जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.