आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजू शेट्टी यांना मागील महिन्यातच कोरोनाची लागण झाली होती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वीय सहायक स्वस्तिक पाटील यांनी गुरुवारी याची पुष्टी करत सांगितले की, शेट्टी यांच्या पायाला सुज आल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वस्तिक पाटील यांनी सांगितले की, "राजू शेट्टी नियमित तपासणीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले होते. त्यांना अस्वस्थ वाटत होते, यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला."

दरम्यान राजू शेट्टी यांनी रुग्णालयातून एक निवेदन जारी करत म्हटले की, "माझ्या शुभचिंतक, कार्यकर्ते, समर्थक आणि कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. माझी प्रकृती स्थिर आहे. मी लवकरच बरा होऊन तुमच्यात येईन."

मागील महिन्यात झाली होती कोरोनाची लागण

राजू शेट्टी यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. संपूर्ण प्रकृती बरी झाल्यानंतर आठवडाभराने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर शेट्टी यांनी अवकाळी पावसाने त्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आंदोलन केले. यादरम्यान, बुधवारी अचानक पायात सूज आल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.

विधानपरिषदेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये शेट्टींचे नाव

शेट्टी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेच्या संयम माने यांच्याकडून पराभूत झाले होते. विधानपरिषदेसाठी राज्यपालांद्वारे नियुक्त होणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये राजू शेट्टी यांचे नावही पुढे येत आहे. राज्य सरकारच्या सुत्रांनीही याची पुष्टी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...