आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील 3 विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’:सातारा आणि रायगड जिल्ह्यातील विद्यालयांचा गौरव

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणाऱ्या महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना वर्ष २०२१-२२ च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्ल‍िश मीडियम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्ल‍िक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी प्रातिनिध‍िक म्हणून त्या-त्या शाळांचे विद्यार्थीही पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्यांसोबत उपस्थित होते. या पुरस्कारांतर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-१९ च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मूल्यांकन झाले.

बातम्या आणखी आहेत...