आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासह्याद्री हॉस्पिटल्सच्या अवयव प्रत्यारोपण पथकाने पुण्यातील पहिले स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. या शस्त्रक्रिया नुकत्याच सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे करण्यात आल्या.
लिव्हर सिरोसिसने (खराब झालेल्या यकृताने ग्रस्त असलेली परिस्थिती) ग्रस्त असलेल्या दोन रुग्णावर एकाच वेळी जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सलग २० तास करण्यात आली. सह्याद्री हॉस्पिटलमधील यकृत प्रत्यारोपणाचे यकृत प्रमुख आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपिन विभूते यांनी याबाबतची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. विभुते म्हणाले, प्रत्येक दाता प्राप्तकर्त्यापैकी एकाच्या नात्यातला असला तरी त्यांचे यकृत परस्परांशी जुळणारे नव्हते म्हणून दुवी-मार्गी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शविली. यामध्ये बुलडाणा येथील शिक्षक अजित (नाव बदलले आहे) आणि नाशिकमधील व्यावसायिक अमर (नाव बदलले आहे) यांचा समावेश आहे.
या दोन्ही व्यक्तींचे रक्तगट सारखेच होते मात्र, त्यांच्या पत्नीचे यकृत परस्परांशी जुळणारे नव्हते. शस्त्रक्रियेदरम्यान अमर यांच्या पत्नी स्वरा (नाव बदलले आहे) यांनी त्यांचे यकृत अजित यांना दिले, तर अजित यांच्या पत्नी गीता (नाव बदलले आहे) यांनी त्याचे यकृत अमर यांना दान केले. २० तासांच्या या कठीण शस्त्रक्रियेने पुणे शहरातील पहिले यशस्वी टू-वे यकृत प्रत्यारोपण स्वैप पार पडले आहे.
डॉ. विभूते म्हणाले, स्वॅप प्रत्यारोपण यापूर्वी मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये झाले आहे, परंतु अलीकडेच झालेले हे प्रत्यारोपण पुण्यातले अशा प्रकारचे पहिलेच आहे. ज्या प्राप्तकर्त्याचे नातेवाईक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत पण रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत अशा प्राप्तकर्त्यांसाठी या प्रकारची देवाणघेवाण जीवनरक्षक सिद्ध झाली आहे.
एकाच वेळी दोन दाते आणि दोन प्राप्तकर्त्यावर शस्त्रक्रिया करून दोन यकृते प्रत्यारोपण करण्यात आली. २५ सदस्यांचा समावेश असलेल्या वैद्यकीय पथकात ११ डॉक्टर आणि इतर कर्मचारी होते. चार ऑपरेटिंग रूममध्ये २० तासांहून अधिक काळ हे अत्यंत कठीण शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.अशा शस्त्रक्रियांपूर्वी रुग्णांचे समुपदेशन फार महत्त्वाची भूमिका बजावते.
भूल देण्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूम मध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान होते.या शस्त्रक्रिया पथकात डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अभिजीत माने, डॉ. विकास चौधरी, डॉ. शरण नरुटे, डॉ. अनुराग श्रीमल, ट्रान्सप्लांट भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर राहुल तांबे, अरुण अशोकन आणि अमन बेले तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शर्मिला पाध्ये आणि अजिंक्य बोराटे यांचा समावेश होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.