आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक सोहळा:पुण्यातील 101 गणेश मंडळे उभारणार स्वराज्यगुढी, 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पुण्यातील तब्बल 101 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणजेच 6 जून शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार आहेत. प्रत्येक मंडळाशी निगडीत असलेले कार्यकर्ते आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती गणेशोत्सव मंडळ तिथे शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, छत्रपती राजाराम मंडळ, बाबू गेनु मंडळ, जिलब्या मारुती मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनी मारुती बाल गणेश मित्र मंडळ, खजिना विहीर मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, सेवा मित्र मंडळ यांसह पुण्यातील 101 मंडळे हा सोहळा साजरा करणार आहेत.

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच 6 जून 1674 हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समता, समाधानाने भरली.

त्यामुळेच 6 जून शिवस्वराज्य दिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही 6 जून 2013 पासून भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज आम्ही निर्माण केला. भविष्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर विश्वभरातील गणेशोत्सव मंडळे यात सहभागी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...