आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:शिक्रापुरात कार व लक्झरीचा भीषण अपघात, कारचालकाचा जागीच मृत्यू, बसमधील 25 जण जखमी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारच्या धडकेने लक्झरी पलटी होऊन वाहनांना धडकत थेट हॉटेलमध्ये शिरली

शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर बजरंग वाडी येथे एक कार दुभाजक ओलांडून लक्झरीला धडकली. त्यामुळे लक्झरी पलटी होऊन थेट एका हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात कारचा चक्काचूर होत तब्बल पाच वाहनांसह हॉटेलचे नुकसान होऊन कारचालक विशाल बबन सासवडे याचा मृत्यू झाला. यासह बसमधील 25 जण जखमी झाल्याची घटना शिक्रापूर येथे घडली. याबाबत शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून लक्झरी बस पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने येत असताना अहमदनगर बाजूने आलेली स्विफ्ट कार अचानकपणे दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येत लक्झरी बसवर आदळली. त्यामुळे लक्झरी बस अचानकपणे शेजारील रॉयल पॅलेस हॉटेल समोर असलेल्या विजेच्या खांब व हॉटेलच्या फलकाला धडकून पलटी होत थेट हॉटेलमध्ये घुसली. यावेळी हॉटेलच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या तीन वाहनांना देखील लक्झरी धडकल्याने या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, विक्रम साळुंके, रणजीत पठारे, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक कल्पेश राखोंडे, राकेश मळेकर, शिवाजी तळोले, भरत कोळी, बापू हडागळे, विकास पाटील, संतोष मार कड, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, जयदीप देवकर, अमोल नलगे, विकास मोरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले व अपघातातील वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली.