आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे चाकण औद्योगिक परिसरात गुन्ह्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशीच एक घटना औद्योगिक वसाहतीत असणा-या खालुंब्रे येथे घडली आहे. एका टोळक्याने वडापाव विकणाऱ्या एका दुकानात जाऊन व्यावसायिकवर तलवारीने वार करत पिस्तुल रोखून ‘पाच हजार रुपये ऐवजी दहा हजार रुपये दे’ अन्यथा तुमच्यापैकी एकालाही जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले. या प्रकरणी आठ जणांवर चाकण पोलिस ठाण्यात मंगळवार 14 जून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8 जाणांवर गुन्हा दाखल
संग्राम संताजी कोकाटे (वय19 ) यांनी केलेल्या तक्रारीवरुन निखिल नंदू बोत्रे (वय 28), आशुतोष रॉय,प्रशांत धर्मा लांडगे (वय 28), तेजस संजय डिक्कर (वय 19) तसेच इतर 5 अनोळखी तरुण अशा नऊ जणांच्या टोळक्यावर खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम कोकाटे यांचे खालुंब्रे येथे वडापावचे हॉटेल आहे. काल रात्री 9 च्या सुमारास वरील नऊ आरोपींनी हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड, तलवारी आणि पिस्तुल घेऊन हॉटेलमधील फिर्यादीचे वडील संताजी कोकाटे यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला तर आई रेणुका यांना डाव्या हातावर वार करून जखमी केले. तसेच हॉटेलमधील कामगार गणपत आसबे व मित्र विजय इंगळे यांच्यावर वार करुन त्यांनी गंभीर जखमी केले.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी निखिल बोत्रे, प्रशांत लांडगे आणि तेजस डिक्कर यांना अटक केली असून इतर आरोपींचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप इंगळे, रेळेकर पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.