आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील विभाजनकारी शक्तींना प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने हरविले जाऊ शकते हा भारत जोडो यात्रेचा संदेश आहे. त्यामुळे अनेक लोक एकत्र आली. काँग्रेस पक्षाला लोक जोडली जातील का? याचा विचार न करता राहुल गांधी आज चालत आहेत. यामुळे लोक त्यांच्याकडे आर्कषली जात आहेत. भारत जोडो यात्रेमुळे देशाची लोकशाही मजबूत होईल अशी खात्री राहुल गांधी यांना आहे, असे वक्तव्य ॲड. असिम सरोदे यांनी केले.
भारत जोडो यात्रेला 100 दिवस पूर्ण झाले त्या निमित्ताने भारत जोडो यात्रा समिती, पुणे तर्फे पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा शुक्रवारी काढण्यात आली. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुतळ्याला हार घालून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली.
या पदयात्रेचे प्रास्ताविक करताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, भारत जोडो यात्रा देश जोडणारी यात्रा असून ही यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलेले असेल. राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेचा जो देश हिताचा उद्देश आहे, त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढीत आहोत.
सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी म्हणाले की, गेल्या आठ वर्षात समाजात, जातीजातीत, धर्माधर्मात व्देष, तेढ निर्माण करून देशातील वातावरण दूषित करण्यात आले आहे. हे प्रयास आजही सुरू आहे. अशा वातावरणात देशाला धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रात पुन्हा एकत्र बांधण्याचे काम महात्मा गांधींचे आचार विचार करू शकत होते. गेले शंभर दिवस कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते ठळकपणे अधोरेखीत केले आहे. त्यामुळे या यात्रेमुळे म.गांधींनी दाखवलेल्या धर्मनिरपेक्षतेचा मार्ग काँग्रेसला पुन्हा एकदा गवसला आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, सत्तारूढ हे धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, महिलांचा सन्मान न करणे, महापुरूषांचा वारंवार अपमान करणे, संविधानाचा न पाळण्याचे काम आत्ताचे सत्ताधारी करीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे मुख्य कार्यकारी असल्यासारखे वागत आहे. या सत्ताधारी पक्षाने लाजलज्जा सोडली आहे म्हणून आम्ही भारत जोडो म्हणत आहोत.
या पदयात्रेत गोपाळ कृष्ण गोखले यांची नात शर्मिष्ठा खेरे, युवराज शाह, निरज जैन, संगिता तिवारी, रजनी त्रिभुवन, रफिक शेख, जाबुंवत मनोहर, ॲड. अनिल कांकरीया, गोपाळ तिवारी, रविंद्र म्हसकर, संदीप मोकाटे, विनय ढेरे, विजय खळदकर, अजित जाधव, अविनाश गोतारणे, रमेश सोनकांबळे, रविंद्र आरडे, हेमंत राजभोज, जयकुमार ठोंबरे इ. कार्यकर्ते सहभागी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.