आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर वारी:पुणेकरांकडून पालखी सोहळ्याचे प्रतीकात्मक स्वागत; ज्ञानेश्वरी गाथेला केले अभिवादन

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्ञानेश्वरीचे पूजन करून पालखी सोहळा आणि संत कार्याला प्रतीकात्मक अभिवादन करण्यात आले.

जगद्गुरू संत तुकारम महाराज आणि माउली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे देहू आणि आळंदी येथून होणारे प्रस्थान आणि त्यानंतर त्या पालख्यांचे पुण्यातील आगमन आणि मुक्काम हा आनंदी सोहळा दरवर्षी पुणेकर अनुभवत असतात. परंतु यंदा हा सोहळा करोनाच्या चक्रव्यूहात अडकल्याने पुणेकरांना या आनंद सोहळ्याला मुकावे लागत आहे. या परिस्थितदेखील पुणेरी बाणा जपत संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका वेगळ्या उपक्रमाद्वारा तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरीचे पूजन करून पालखी सोहळा आणि संत कार्याला प्रतीकात्मक अभिवादन करण्यात आले. या पालख्यांच्या पुण्यातील स्वागताची अनेक संस्थांची दीर्घकालीन परंपरा आहे. त्याच पंरपरेला स्मरून संत तुकारामांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संत तुकाराम गाथा आणि संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी डोक्यावर ठेवून प्रातिनिधिक स्वागत केले आणि प्रदक्षिणेसह या ग्रंथांचे पूजन केले.

समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन, चैतन्य महाराज कबीर (आळंदी), पुणे महानागरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, सचिन ईटकर, किरण साळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...