आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस उपायुक्त परिमंडळ दाेन मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चाेरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, अवैध दारु विक्री करणे अशाप्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत नऊ गुन्हेगारांना एकाचवेळी तडीपार करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दाेनचे पोलिस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी शनिवारी दिली आहे.
तडीपार करण्यात आलेल्या आराेपी मध्ये स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 प्रमाणे हिऱ्या ऊर्फ अजीज सलामत शेख (रा.गुलटेकडी,पुणे), शंकर नागप्पा निकले (32,रा.गुलटेकडी,पुणे) व राेशन मिठ्ठु घाेरपडे (19,रा.गुलटेकडी,पुणे) , सहकारनगर पोलिस स्टेशन हद्दीतील महेश अनिल साळुंखे (वय-25,रा.धनकवडी,पुणे), शुभम सिताराम शिंदे (20,रा.धनकवडी,पुणे) , भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीतील विशाल बालाजी साेमवंशी (21,रा.आंबेगाव खु.पुणे), सुजित दत्तात्र्य पवार (20,रा.आंबेगाव,पुणे), आकाश रविंद्र उणेचा (20,रा.काेंढवा) आणि सुजित सुरेश सरपाले (26,रा.कात्रज,पुणे) या आराेपींचा समावेश आहे.
सदर आराेपींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून पोलिसांचे रेकाॅर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधित पोलिस स्टेशन कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलिस उपआयुक्त परिमंडळ दाेनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी यांनी सदर प्रस्तावाची चाैकशी पूर्ण करुन नऊ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 व 56 प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हयातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापुढील काळात देखील रेकाॅर्डवरील क्रीयाशील गुन्हेगारांवर अशाचप्रकारची ठाेस कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.