आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अडीच लाखांची लाच घेताना शिक्षक, अभियंता लाचलुचपतकडून अटकेत

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव माेबदल्याचा प्रस्ताव पाठवण्यासाठी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी लघु पाटबंधारे विभागातील एका अभियंत्याने केली. अडीच लाखांची रक्कम एका शिक्षकाच्या माध्यमातून बारामतीतील जळाेची रस्ता येथे घेताना दाेघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले.

अभियंता संदीप गाेंजारी व त्याचा साथीदार शिक्षक प्रकाश सुर्यवंशी (४०) असे याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याप्रकरणी बारामती पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव माेबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठवल्याचा माेबदला म्हणून लघु पाटबंधारे खात्यातील अभियंता संदीप गाेंजारी याने अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली हाेती. परंतु तक्रारदार यांना आराेपीला पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करून दाद मागितली. अभियंता गाेजारी याच्या वतीने लाच घेण्यास आलेला शिक्षक प्रकाश सूर्यवंशी रंगेहाथ पैसे घेताना एसीबीच्या पथकाने पकडला. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

५० हजारांची लाच घेणारा पाेलिस उपनिरीक्षक निलंबित पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या घराच्या मालकी हक्काच्या वादातील गुन्ह्यात आराेपीकडून ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पाेलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे याला निलंबित करण्यात आले आहे. शिंदे हे अलंकार पाेलिस ठाण्यात पाेलिस उपनिरीक्षक म्हणून काम करत हाेते आणि डहाणूकर पाेलिस चाैकीचे कामकाज पाहत हाेते. आराेपींना अटक करण्याची भीती दाखवून ५० हजार रुपये स्वीकारल्याचे चाैकशीत निष्पन्न झाल्याने अपर पाेलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांनी त्यांचे निलंबन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...