आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकाचा राजीनामा:76 हजारांच्या पगारावर पाणी; पूर्णवेळ करणार पक्षाचे काम, ठाकरेंची घेणार भेट

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्याच्या राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्याने शिवसेनेला देखील खिंडार पडले आहे. त्यातच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी थेट आपल्या नोकरीचाच राजीनामा दिला आहे. सध्या या शिक्षकाची जोरदार चर्चा रंगली आहे. 76 हजारांच्या पगारावर पाणी सोडत आता पूर्णवेळ पक्षाचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवून शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. 27 जुलै त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते 2002 पासून सेवेत आहेत.

सोशल मीडियावर चर्चा

वालचंदनगर येथील पाठशाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा 20 वर्ष सहा महिने इतकी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी राजीनामा देणारे ते बहुतेक राज्यतील पहिलेच शिक्षक असावेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.

76 हजार पगार होता

याबाबत खरात म्हणाले, मी शिवसेनेत अद्याप प्रवेश केलेला नाही. परंतु मी शिवसेना समर्थक म्हणून सन 2005 पासून कार्यरत आहे. मला शिक्षक म्हणून 76 हजार होता आणि राजीनामा दिल्यावर 25 हजार पेन्शन मिळेल, त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. माझी आणखी 17 वर्ष शिक्षक सेवा बाकी होती.

उद्धव ठाकरेंची भेट घेणार

सध्या शिवसेनेतून अनेकजण बाहेर गेल्याने मी पक्षासाठी पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कुटुंबियांनाही मी माझा निर्णय सांगितला आहे. उद्या मातोश्री येथे मला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास बोलावले आहे. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करून पूर्ण वेळ आगामी काळात पक्षाचे काम करणार आहे.

शिक्षक दीपक पोपट खरात.
शिक्षक दीपक पोपट खरात.
नोकरीचा राजीनामा दिला.
नोकरीचा राजीनामा दिला.
बातम्या आणखी आहेत...