आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑनलाइन अॅपद्वारे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने पुण्यात सुरू असणाऱ्या एका कॉल सेंटर वर छापा टाकत मोठी कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी १०० हून अधिक लॅपटॉप आणि मोबाइल जप्त केले आहेत. तसेच अनेक कागदपत्रे ही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यात लाखो रुपये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
हैदराबाद आणि तेलंगणा परिसरात ऑनलाइन लोन देणाऱ्या कंपन्या पोलिसांच्या रडारवर आहेत. ऑनलाइन लोन देण्यासंदर्भातील प्रक्रिया पुण्यातील एका कॉल सेंटरमधून सुरू असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांची मदत घेत शनिवारी या कॉल सेंटरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
तेलंगणामध्ये कारवाई
गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्येही पोलिसांनी मोठी कारवाई करून ऑनलाइन अॅपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कंपनी ग्राहकांची फसवणूक करून त्यांना धमक्या देत असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.