आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची धडक कारवाई:वाहनचोरी आणि नागरिकांना अडवून लुटणारे सराईत अटकेत, दहा गुन्हे उघडकीस

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या तसेच नागरिकांना अडवून जबरदस्तीने लुटणाऱ्या दोघा सराईतांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोर मोबाईल आणि चोरीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून वाहनचोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिनेश हरकाबहाद्दूर विका, खंडू राजू विठूबोने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बंडगार्डन पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. पुणे स्टेशन परिसरातील टपऱ्याच्या आड दोघेजण संशयितरित्या थांबल्याचे दिसल्याने उपनिरीक्षक राहूल पवार यांच्या पथकाने आरोपींचा पाठलाग केला. त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दिनेशला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर, त्याचा साथीदार खंडू पळून जाण्यात यशस्वी झाला. दिनेशकडील दुचाकी ही चोरीची असल्याचे तपासात समोर आले. त्यानूसार त्याला अटक केली असता त्याने साथीदार खंडू याच्यासह देहूरोड व चाकण पोलीस ठाणे हद्दीत एकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून मोबाईल चोरल्याचे कबूल केले. तर, अन्य दोघांकडूनही मोबाईल चोरले. त्यानूसार पोलिसांनी खंडूला भोसरीमधून अटक केली. तपासामध्ये दोघा आरोपींनी त्यांचा आणखी एक साथीदार निखील याच्यासह शहर परिसरात वाहनचोरी केल्याची कबूली दिली.

आरोपींकडून बंडगार्डन पोलिसांनी चोरीच्या 9 दुचाकी, चार मोबाईल असा 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विविध पोलीस ठाण्यातील 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त आर. एन. राजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक आश्विनी सातपुते, पोलिस उपनिरीक्षक राहूल पवार, सहायक फौजदार मोहन काळे, अंमलदार हरीष मोरे, प्रताप गायकवाड, राजू धुलागुडे, संजय वणवे, अमोल सरडे, सुधीर घोटकुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

बातम्या आणखी आहेत...