आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:दोन महिन्यांत बिबट्याचे दहा बछडे आईजवळ, विहिरीत अडकलेल्या बिबट्यांची सुटका

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत वनविभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस यांनी बिबट्याचे तब्बल दहा बछडे आईजवळ पोचवण्यात यश मिळवले आहे. तसेच विहिरीत अडकलेल्या बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

सोमवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी गावातील ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळले. स्थानिक नागरिकांनी त्वरित वनविभागाला याविषयी माहिती दिली. तात्काळ वनविभागाचे कर्मचारी पथक आणि वाईल्डलाईफ एसओएसची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पुरेशी सावधगिरी बाळगून बछड्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नर येथील बिबटे निवारा केंद्रात नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. निखिल बांगर यांनी तीनही बछड्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात दोन नर तर एक मादी बछडा होता. त्यांचे वय अवघ्या पंधरा दिवसांचे होते. बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना लगेचच त्यांच्या आईजवळ पोचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. बछडे जिथे सापडले होते, तिथेच एका खोक्यात ते रात्री ठेवण्यात आले. पण पहिल्या रात्री बछड्यांची आई तिकडे फिरकली नाही. त्यामुळे आणखी एक प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुन्हा बछडे शेताजवळ खोक्यात ठेवण्यात आले. दुसर्या रात्री मात्र बछड्यांची आई सावधगिरीने तिथे दाखल झाली आणि एक एक पिल्लू तोंडात अलगद पकडून आईने तीनही बछडे सुरक्षित ठिकाणी नेले.

जुन्नरचेद्वारे वनाधिकारी योगेश घोडके म्हणाले, 'जुन्नर परिसरात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. जंगले तुटत असल्याने नाईलाजाने वन्य प्राणी प्रजननासाठी उसाच्या शेतात निवारा शोधतात. गेल्या दोन महिन्यांत आम्ही बिबट्याचे दहा बछडे आईजवळ पोचवण्यात यश मिळवले आहे, '.

वाईल्डलाईफ एसओएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण म्हणाले की, ऊस तोडणीचे दिवस आणि बिबट्यांच्या प्रजननाचा काळ एकच असल्याने वारंवार बछडे आळळतात. वन्यजीवांचे अधिवास आपण नष्ट केल्याने नाईलाजाने वन्य प्राण्यांना ऊसाच्या शेतात आश्रय शोधावा लागत आहे,'.

बातम्या आणखी आहेत...