आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी घोटाळा:टीईटी-2018 परीक्षेत 1700 अपात्र परीक्षार्थींना केले पात्र, 50 हजार ते 1 लाख घेत कोट्यवधींचा गैरव्यवहार

पुणे / मंगेश फल्ले7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१९ च्या परीक्षेत परीक्षेपूर्वीच पेपर फाेडून एजंटमार्फत ताे परीक्षार्थींपर्यंत पाेहोचवून तब्बल ७ हजार ७८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आल्याची धक्कादायक बाब पाेलिसांच्या चाैकशीत उघडकीस आली. मात्र, आता टीईटी-२०१८ च्या परीक्षेतही आराेपींनी गैरव्यवहार केल्याची बाब निष्पन्न झाली असून आतापर्यंत तब्बल १७०० अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे तपासादरम्यान समाेर आले. यात मराठवाडा व नाशिकचे सर्वाधिक अपात्र परीक्षार्थीं आहेत.

या प्रकरणात एकूण १२ आराेपींना सायबर गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अटक केली आहे. सन २०१८ च्या टीईटी परीक्षेच्या निकालात आराेपींनी फेरफार केली. परीक्षा आयाेजनाचे कंत्राटदार जीए साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजीचा संचालक अश्विनकुमारनेे परिषदेच्या संकेतस्थळावर नियंत्रण असलेल्या राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, तुकाराम सुपे व शिक्षण विभागातील अभिषेक सावरीकर यांनी सोबत मिळून अपात्र असलेल्या ६०० ते ७०० परीक्षार्थींचे प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेऊन पात्र यादीत नाव टाकले. त्यांनी सुमारे ३ काेटी रुपये वाटून घेतल्याचे प्रथम निष्पन्न झाले. मात्र, पाेलिसांच्या सखाेल तपासात आराेपींनी आतापर्यंत १७०० अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात एजंट संताेष हरकळ व अंकुश हरकळने मुख्य भूमिका बजावली. त्यांच्याकडे पैसे घेतल्याची परीक्षार्थींची यादी होती.

कुणाला मिळाले किती पैसे
२० लाख सुखदेव डेरे, तत्कालीन अध्यक्ष
०२ कोटी गणेशन, जी. ए. साॅफ्टवेअर संस्थापक
३० लाख तुकाराम सुपे, निलंबित आयुक्त
०५ कोटी अश्विनकुमार जी. ए. साॅफ्टवेअर, व्यवस्थापक

बातम्या आणखी आहेत...