आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१८ च्या परीक्षेतील गैरव्यवहार पुणे सायबर पाेलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले एजंट संताेष हरकळ (४२, रा.औरंगाबाद) व अंकुश हरकळ (४२, रा.सिंदखेडराजा, बुलडाणा) यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील पाच एजंटकडून ५ काेटी ३७ लाख रुपये गोळा करून ते डाॅ. प्रीतीश देशमुख, अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरुन जीए साॅफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार शिवकुमार (रा.बंगळुरू) यास दिल्याचे पाेलिस तपासात उघडकीस आले आहे.
सुपेच्या तपासात ताे नाशिक येथे कार्यरत असताना त्याच्या ओळखीचे व्यक्ती दीपक व्याळीज यांच्या मुलास परीक्षेत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्याने एका अनाेळखी व्यक्तीमार्फत व्याळीज यांच्या मुलाचे हाॅल तिकीट घेतले व काम झाल्यानंतर २ ते ३ लाख रुपये देण्यास सांगितल्याचे तपासात समाेर आले आहे.
मंगल कार्यालयात पेपर फाेडला
बीडहून अटक केलेला अतुल राख (३०, रा.थेरला, ता.पाटाेदा, बीड) हा फरार आराेपी जीवन सानपचा मेहुणा आहे. सानपकडून त्यास पेपर मिळत हाेते. आराेग्य भरती ‘गट-क’ परीक्षेपूर्वीच त्याने आळंदी येथील एका मंगल कार्यालयात पेपर फाेडल्याचे तपासात समाेर आले आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याने बीड, अहमदनगर परिसरातील ६० ते ७० परीक्षार्थी आळंदीतील एका मंगल कार्यालयात जमा केले. त्या ठिकाणी परीक्षार्थींना पेपरची उत्तरसूची दिली. पेपर हाेण्यापूर्वी १ लाख रुपये घेऊन उर्वरित पैसे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. त्यासाठी प्रत्येकी ८ ते १० लाख रुपयांचा दर ठरवण्यात आला होता. आतापर्यंत राख याच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या ३९ विद्यार्थ्यांची माहिती पाेलिसांना मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.