आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेमप्रकरणातील वादातून एका तरुणाने पुण्यातील औंध परिसरात 26 वर्षीय तरुणीचा तिच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये चाकूने वार करून तिचा निघृण खून केल्याचा प्रकार बुधवारी घडला हाेता. त्यानंतर पसार झालेला आराेपीचा पोलिस शाेध घेत असताना, बावधन जवळील मुशी धरणाच्या जंगलात त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे गुरुवारी (10 नोव्हेंबर) समोर आले.
श्वेता रानवडे (वय-26) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रतीक किसन ढमाले (वय-27,रा.कडुस, राजगुरुनगर,पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात तरुणीची आई दीपाली विजय रानवडे (वय-47) यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्ीतिक ढमाले, त्याचे वडील किसन ढमाले आणि प्रतिकचा मित्र राेहित यांचे विराेधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.
काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली श्वेता आणि आराेपी प्रतिक ढमाले यांची एकमेकांशी 2018 मध्ये ओळख झाली होती. तक्रारदार दीपाली रानवडे यांच्या भावाचे मुलीचे लग्नात ही ओळख झाल्यानंतर सदर दाेघात मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले हाेते. श्वेताने प्रतीक साेबत लग्न करण्याबाबत आईला सांगितले हाेते व तिनेही त्यास हाेकार दिला हाेता. नंतर सदर दाेघात प्रेमसंबंध असताना प्रतिक सातत्याने श्वेतावर संशय घेत भांडण करत हाेता. त्यामुळे श्वेताने प्रतीक साेबत लग्न करण्यास नकार दिला हाेता.
प्रतीकने त्यावेळी तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच प्रतीकचे वडील किसन ढमाले यांनी तक्रारदार यांचे नणंदेचा पती वसंत पवार यांचे जवळ श्वेता हिचे लग्न माझा मुलगा प्रतिक याचेशी झाले पाहिजे नाहीतर परिणाम वाईट हाेतील अशी धमकी दिली.
चाकूने वार करुन खून
12/6/2021 राेजी प्रतिक व त्याचा मित्र राेहितने श्वेता हिस जबरदस्तीने त्यांचे कारमध्ये बसवून श्वेता हीस लाेणावळा येथे फिरायला जावू नकाे अशी धमकी दिली हाेती. बुधवारी श्वेता राहत्या घराच्या पार्किंग मध्येदुचाकी पार्क करत असताना प्रतीक माले याने सदर ठिकाणी दुचाकीवर येवून चाकुसारख्या हत्याराने श्वेताचे पाेटात, छातीवर, हातावर वार करुन गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. त्यानंतर ताे पसार झाला हाेता. त्याचा शाेध घेताना ताे मिळून येत नव्हता. अखेर गुरवारी त्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याची माहिती चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस झरेकर करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.