आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:पुण्यात खाणीत मिळाले दोन तरुणाचे मृतदेह, खून झाला असल्याचा मृतांच्या नातेवाईकांचा आरोप

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील विश्रांतवाडी येथील खाणीत दोन तरुणांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ शनिवारी उडाली आहे. या घटनेमुळे विश्रांतवाडी परिसरात मयत तरुण राहत असलेल्या भागात शोकाकुल वातावरण पसरले आहे. विकी लंके आणि प्रसन्न थूल अशी खाणीत मिळालेल्या मृतदेहांची नावे आहे.

दरम्यान, विकी आणि प्रसन्न यांचा खून झाला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. सहा जूनला रात्री विकी आणि प्रसन्न बेपत्ता झाले होते. त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांची शोधाशोध सुरु होती. याबाबत विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये हे दोघे बेपत्ता झाल्याची तक्रारही नातेवाइकांनी दिली होती. पण, गेले काही दिवस त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

परंतु, आज दोघांचेही मृतदेह विश्रांतवाडीच्या खाणीत आढळल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. विकी लंके आणि प्रसन थुल या दोघांची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ससून रुग्णालयात शववि्छेदनासाठी पाठवले. याबाबत विश्रांतवाडी पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...