आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:जुन्या वादातून युवकाची निर्घृण हत्या, कोयत्याने सपासप केले वार; पिंपरी चिंचवडमधील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शुभम जर्नाधन नखाते
  • युवक आणि आरोपींमध्ये वडापावची गाडी लावण्यावरून झाला होता वाद

पुण्यात वडापावची गाडी लावण्यावरून झालेल्या वादानंतर एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी तापकीर चौकात बुधवारी रात्रीच्या ही घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम जर्नाधन नखाते (वय 30) असे हत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी वडापावची गाडी लावण्यावरून मयत शुभम आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. बुधवारी (19 ऑगस्ट) याच मुद्द्यावरून संध्याकाळी 4 वाजता पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यानंतर रात्री 9 वाजता आरोपींनी शुभमला तपकीर चौकात घेरले आणि कोयत्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील, अविनाश भंडारी, प्रवीण धुमाळ या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक चौगुले करत आहेत.

0