आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणरागिणीचे धाडसी कृत्य:बस चालकाला अचानक फीट आल्याने प्रवासी महिलेने हातात घेतले बसचे स्टेअरिंग, पुण्यातील महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक; पाहा व्हिडिओ

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला या कायम पुरुषांच्या बरोबरीने काम करतात असे म्हणतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा पुण्यात पाहायला मिळाली. पुण्यातील एका महिलेने कौतुकास्पद काम केले आहे. चालत्या बस चालकाला अचानक बस चालवताना फिट आल्यानंतर प्रसंगावधान राखत स्वतःच्या हातात स्टेअरिंग घेत चालकासह आपल्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण वाचवले आहेत.

काय घडले होते?

पुण्याजवळील वाघोली येथे महिलांचा एक ग्रूप बसने मोराची चिंचोळी येथे पर्यटनासाठी निघाला होता. यावेळी बस चालकाला बस चालवत असताना चालकाला अचानक फिट आल्यामुळे त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले. यावेळी योगिता सातव यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी चालकाला गाडी शेजारी थांबवायला सांगितले. चालकाने ही गाडी शेजारी थांबवली असता तो कोसलळला. यानंतर योगिता यांनी परिस्थितीचे भान राखून बसचे स्टेअरिंग हातात घेतले आणि बस हॉस्पिटलच्या दिशेने नेली.

योगिता यांनी 10 किमीपर्यंत चालवली बस

योगिता यांनी याआधी कधीही बस चालवलेली नव्हती. त्यांना फक्त कार चालवण्याचा अनुभव आहे. परंतू समोर आलेला प्रसंग पाहता हार न मानता योगिता यांनी बस चालवत ती सुरक्षितपणे हॉस्पिटलमध्ये पोहचवत चालकाला जिवनदान दिलं आहे. योगिता सातव यांनी जवळपास 10 किलोमीटरपर्यंत बस चालवत धीराने परिस्थिती हाताळत या चालकाचे प्राण वाचवत आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही कसला त्रास होणार नाही याची काळजी घेतली.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून योगिता सातव यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

योगिता यांच्या गावच्या माजी सरपंचांनी त्यांच्या घरी जाऊन गौरव केला आहे.
योगिता यांच्या गावच्या माजी सरपंचांनी त्यांच्या घरी जाऊन गौरव केला आहे.

योगिता यांचा करण्यात आला गौरव
योगिता यांनी सांगितले की, त्यांनी बस 10 किलोमीटर चालवली आणि त्यातील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले. वाघोली गावच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांनी त्यांच्या सहकारी व सहलीच्या आयोजक आशा वाघमारे यांच्यासह योगिता सातव यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. जयश्री सातव म्हणाल्या की, अनेक महिला चारचाकी चालवतात, मात्र वाघोलीच्या योगिता सातव यांनी गंभीर अवस्थेत बस चालविण्याचे केलेले काम खरोखरच धाडसी कृत्य आहे. समाजात महिला कोणत्याही स्तरावर कमकुवत नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले.

बातम्या आणखी आहेत...