आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:घरासाठी त्रास देणाऱ्या भावाचे खून प्रकरण 5 वर्षांनी उघड

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका प्रकरणात राहते घर स्वत:च्या नावावर करून देण्याकरिता सातत्याने तगादा लावणाऱ्या भावाचा सख्ख्या भावाने आ‍णि बहिणीने मिळून साथीदारांच्या मदतीने खून केल्याची बाब पाेलिसांच्या चाैकशीत ५ वर्षांनंतर निष्पन्न झाली आ‍हे. याप्रकरणी ४ आ‍राेपींवर हडपसर पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आ‍ला असून एका आ‍राेपीस अटक केली आ‍हे.

मार्च २०१७ मध्ये पंकज दिघे (रा.पुणे) याचा खून झाला होता. तेव्हा फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. आता पाच वर्षांनी याप्रकरणी पाेलिसांनी त्याचा भाऊ सुहास दिघे, बहीण अश्विनी आ‍डसूळ, प्रशांत व महेश बाबूराव धनावडे (३७, रा. शिवणे, पुणे) या आ‍राेपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच आ‍राेपी महेश धनावडेला अटक केली आ‍हे. इतर आरोपी फरार आहेत. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनचे पाेलिस हवालदार राजेंद्र नारायण मारणे यांनी आ‍राेपींविराेधात फिर्याद दिली.

घरफाेडीच्या गुन्ह्याच्या माध्यातून खुनाचा गुन्हा झाला उघडकीस तपास अधिकारी पाेलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील म्हणाले, संगमेश्वर ज्वेलर्स येथील घरफाेडी गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक करत आ‍हे. सदर गुन्ह्यात इलेक्ट्रिशियनचे काम करणारा आ‍राेपी सुहास दिघेला अटक करण्यात आ‍ली होती, तो सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन काेठडीत आ‍हे. त्याची पार्श्वभूमी काढली असता, त्याने त्याचा एक भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार डेक्कन पाेलिसांना दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता सुहास चाचपडला. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर त्याने भावाचा खुन केलेल्याच मान्य केले आणि पाच वर्षांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आ‍ला.

बातम्या आणखी आहेत...