आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:चलनावर लिहलेल्या रक्कमेवर खाडाखोड करत पतसंस्थेच्या चेअरमनने कर्जदाराला घातला 10 लाखाला गंडा,

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विश्रांतवाडी परिसरातील एका पतसंस्थेच्या चेअरमनने कर्जदाराला तब्बल दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. चलनावर लिहलेल्या रक्कमेवर खाडाखोडकरून ही फसवणूक केली.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात देवकुमार प्रभाकरण (वय 54, रा. टिंगरेनगर,पुणे) याच्यावर आज गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भैरवनाथ उकारडे (वय 51) यांनी तक्रार दिली आहे. ऑक्टोंबर 2018 ते 2022 या कालावधी हा प्रकार घडला आहे.

नेमके काय घडले?

विश्रांतवाडीत केरा नागरी पतसंस्था आहे. पतसंस्थेचे देवकुमार हे चेअरमन आहेत. तर, यातील तक्रारदार भैरवनाथ हे कर्जदार आहेत. देवकुमार याने तक्रारदारांना 15 लाख रुपयांचे कर्ज द्यायचे आहे, असे सांगून बोलावून घेतले. त्यांच्याकडून व्हिड्राव्हल स्लिपवर स्वाक्षरी घेतली. तसेच, दिलेला 10 हजार 800 रुपयांचा व्हिड्राव्हल स्लिपवर देवकुमार याने स्वत:च्या हस्ताक्षरात "ट्रान्सफार ऑफ रू. 2 लाख 38 हजार 800 रुपये एफ. डी. लोन अकाउंट ऑफ देवकुमार प्रभाकरण व 7 लाख 62 हजार देवकुमार प्रभाकरण असे इंग्रजीत लिहून या चलणावर अक्षरी लिहलेल्या रक्कमेत खाडाखोड करून त्यात 10 हजार ऐवजी 10 लाख लिहले. खाडाखोड करत तक्रारदार यांच्या लोन अकाउंटमधून 10 लाख 800 रुपये आपल्या नावावर वळते करून घेत तक्रारदारांची फसवणूक केली.

बातम्या आणखी आहेत...