आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलानेच केली आईची फसवणूक:बँक खात्यातून 46 लाखांची रक्कम वळती; संशयितांवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईपासून विभक्त राहणाऱ्या मुलाने आईचा विश्वास संपादन करून बँक खात्यालील 46 लाखांची रक्कम वळती केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी आईने मुलासह, सून व नातवां विराेधात मुंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

कुसुम मारुती टिळेकर (वय-85,रा.केशवनगर, मुंढवा,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा बाळासाहेब मारुती टिळेकर, मुलगा मिलिंद मारुती टिळेकर, सून सुनिता बाळासाहेब टिळेकर, स्वाती मिलिंद टिळेकर व नात अक्षदा देवकर यांचेवर पोलिसांनी आर्थिक फसवणुक व ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम चारनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 16/4/2012 ते 5/12/2022 यादरम्यान घडलेला आहे.

स्वत: साठी पैशाचा केला वापर

तक्रारदार कुसुम टिळेकर या ज्येष्ठ नागरिक महिला आहे. त्यांचे मुले, सुन व नात हे त्यांची कधीही विचारपूस करत नाही परंतु टिळेकर यांना त्यांच्या माहेरकडून पैसे मिळणार आहे अशी माहिती मुलांना व सूनांना समजली. त्यानंतर मुले , सुना व नात त्यांचेकडे येवुन त्यांची विचारपूस करुन तक्रारदार यांना न्यायालयाच्या कामाकरिता सहया लागतात असे खाेटे कारण सांगुन त्यांच्या सहया घेतल्या. त्यानंतर परस्पर मुले व सुनांनी ज्येेष्ठ नागरिक महिलेच्या बँक खात्यावरुन परस्पर 46 लाख रुपये काढून घेत त्याचा स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी वापर केला. त्यानंतर तक्रारदार आईची राहते घरातील पाणी व लाईट बंद करुन त्यांचा सांभाळ करण्यास नकार देऊन त्यांना मानसिक व शारिरिक त्रास देवून व अंगावर धावून येवुन शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...