आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहराजवळ हडपसर ते सासवड रस्त्यावरील वडकी गावातील शेतात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. खून करून तरुणाचा मृतदेह शेतात टाकण्यात आला असून खून झालेल्या तरुणाची पोलिसांना अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
याप्रकरणी लोणीकाळभोरचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावर टाकमाळ परिसरात एका हाॅटेल व्यावसायिकाची शेतजमीन आहे. शेतातील लाकडे हाॅटेल व्यावसायिक हॉटेलच्या कामास जळणासाठी वापरतो. हाॅटेलमधील एक कामगार शेतात लाकडे आणण्यासाठी गेला होते. त्यावेळी त्यास जवळच्या झुडपात एका अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला.
त्यानंतर या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली. मृतदेह कुजलेला असल्याने पोलिसांना मृताचीओळख पटलेली नाही. तरुणाचा खून करुन मृतदेह शेतात टाकण्यात आल्याचा प्रार्थामिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविचेच्छन अहवालात तरुणाच्या मानेवर शस्त्राने वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहेत.
मंदिरातून दानपेटी चोरीस
पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात असलेल्या श्री साईबाबा मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली.याबाबत दिलीप बहिरट (वय- 55, रा. मंगळवार पेठ,पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे मंदिर आहे.
रामनवमीनिमित्त मंदिरात उत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या दरवाज्याचे कुलुप अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर चोरट्यांनी दानपेटी चोरुन नेली. दानपेटीत नेमकी किती रोकड होती, याबाबतची माहिती मिळाली नाही. पोलिसांकडून मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.