आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:डिलिव्हरी बाॅयने पळवला 90 हजारांचा आयफोन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डिलिव्हरी डॉटकॉम कंपनीत कामाला असलेल्या डिलिव्हरी बॉयने ऑर्डर देण्याचा बहाणा करत तरुणाच्या हातातील ९० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना २ जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कर्वेनरमध्ये घडली आहे. करण पानिंद्रे( रा. कर्वेनगर,पुणे) याच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत चव्हाण (२७) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी चंद्रकांतने डिलीव्हरी डॉट कॉम कंपनीतून वस्तूचे पार्सल मागवले होते. पार्सल देण्यासाठी आलेल्या करणने त्यांच्या हातातील ९० हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...