आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The Demands Of The Maratha Community Will Have To Be Protected By Amending The Constitution, Said Home Minister Dilip Walse Patil

मराठा आरक्षण:घटना दुरुस्ती करून मराठा समाजाच्या मागणीला संरक्षण द्यावे लागेल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मत

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवायचे असल्यास केंद्रीय मागसवर्गीय आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे. मात्र, त्याची घटना दुरुस्ती दिल्लीतच करावी लागेल. वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करून मराठा समाजाच्या मागणीला संरक्षण द्यावे लागेल, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाला दिलेल्या भेटी दरम्यान व्यक्त केले. राज्यात मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी भाष्य केले. कोरोनामुळे पोलिस व आरोग्य विभागावर ताण आहे. त्यामुळे कोणीही चिथावणीखोर वक्तव्य करू नये, लोकांच्या मनामध्ये राग निर्माण करू नये, असेही अवाहन गृहमंत्री वळसे पाटील यांनी केले.

दरम्यान, गृहमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रथमतःच वळसे पाटील यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेताना भरोसा सेल, ज्येष्ठ नागरिक कक्ष, बाल कक्षाच्या कामाबाबत माहिती घेतली. तसेच पुणे पोलिसांच्या चांगल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

‘त्या’ फोनला सकारात्मक प्रतिसाद
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व पोलिस ठाण्यांत पुणे पोलिसांकडून दिल्या जात असलेल्या सेवेबाबत चौकशी करण्यासाठी एक फोन लावला. त्यामध्ये तो फोन मुंढवा पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केलेल्या रमेश राऊत यांना लागला. त्यांना गृहमंत्र्यानी मुंढवा पोलिसांनी दिलेल्या सेवेबद्दल विचारणा केली. त्यावेळी राऊत यांनीही पोलिसांनी तत्परतेने सेवा दिल्याचे व चांगली वागणूक मिळाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...