आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जीभेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहेत. अशातच जीभेचा कॅन्सर झालेल्या एका 56 वर्षीय व्यक्तीची जीभ कापून त्याजागी नवीन जीभ तयार करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.
ही नवीन जीभ या व्यक्तीच्या छातीच्या स्नायूपासून तयार करण्यात आली आहे. पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती सोमवारी देण्यात आली.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रफुल्ल प्रधान, कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. कमलेश बोकिल आणि प्लॉस्टिक अँण्ड कॉस्मेटिक सर्जन डॉ. अमित मुळे यांनी एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
सुधीर कांबळे हा रूग्ण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात राहणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जीभेला जखम झाली होती. जखम लहान असल्याने रूग्णाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु हळुहळु ही जखम वाढत गेल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवले. मात्र, काहीही फरक पडला नाही. तोंडातील व्रण आणि जखम वाढल्याने त्यांना तोंड उघडता येत नव्हतं. खातानाही त्यांना त्रास जाणवत होता. अशा स्थितीत एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून कुटुंबियांनी त्यांना पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रफुल्ल प्रधान यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. बायोप्सी चाचणीत रूग्णाला जीभेचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे टोटल ग्लॉसेक्टॉमी शस्त्रक्रिया करून रूग्णाची जीभ काढून टाकली आणि नवीन जीभ तयार केली.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रफुल्ल प्रधान म्हणाले की, तोंडात जखम झाल्याने रूग्ण उपचारासाठी आला होता. अशा स्थितीत तोंडात झालेल्या जखमीचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी बायोप्सी चाचणी केली. या चाचणी अहवालात रूग्णाला जीभेचा कर्करोग असल्याचं निदान झालं. हा कर्करोग जीभेच्या उजव्या बाजूला सुरू होऊन डाव्याबाजूला पसरला होता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करून जीभ काढून टाकणे हा एकमेव पर्य़ाय होता. त्यानुसार नातेवाईकांची परवानगी घेऊन टोटल ग्लॉसेक्टॉमी शस्त्रक्रियेद्वारे ही जीभ काढून टाकण्यात आली. याशिवाय मानेतही कर्करोगाच्या गाठीही काढून टाकण्यात आल्या. ग्लॉसेक्टॉमी एक सर्जिकल प्रक्रिया आहे. जीभेचा कर्करोग वाढल्यास ही शस्त्रक्रिया करून जीभ काढून त्याजागी नवीन जीभ तयार केली जाते. यामुळे रूग्णाला अन्न गिळता येऊ शकतं. याशिवाय बोलतानाही त्यांना अचडणी येत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.