आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गांवर लुटमार:लिफ्ट मागून कारचालकास भामट्यांनी लुटले, कारचा धक्का लागून चोरट्याचा पाय फ्रॅक्चर

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावर प्रवास करत असताना वेगवेगळया प्रकारचे लुटमारीचे घटना विविध ठिकाणी घडतात. मात्र, पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथून दाेन जणांनी एका कार चालकास लिफ्ट मागून खेड तालुक्यात नाणेकरवाडी येथे जाण्यासाठी निघाले. मात्र, वाटेत कारचालकास दारु पिण्यासाठी थांबवून त्यास दारु पाजून भामटयांनी लुटल्याचा प्रकार 22 जून राेजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, कारचालक लुटमारी नंतर घाबरुन गाडी घेऊन जाताना त्याच्या कारचा धक्का एका चाेरट्यास लागून त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार घडला आहे.

साेमनाथ हनुमंत पवार (वय-28,रा.नाणेकरवाडी, ता.खेड,पुणे, मु.रा.साखरवाडी, ता.फलटण, सातारा) असे जखमी झालेल्या आराेपीचे नाव असून ताे अद्याप रुग्णालयात औषधउपचार घेत असल्याने त्यास अद्याप अटक करण्यात आलेले नाही. त्याच्यासह साथीदार अजय जाधव याचेवरही पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शाेध घेण्यात येत आहे. याप्रकरणी अमाेल शिवाजी वर्पे (वय-38, रा,कर्वेनगर, पुणे, मु.रा.रहीमपुर, ता.संगमेनर, अहमदनगर) यांनी चाकण पाेलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.

अमाेल वर्पे हे मंचर येथून खेडच्या दिशेने रात्रीच्या वेळी येत असताना त्यांना दाेन्ही आराेपींनी लिफ्ट मागितली. त्यानंतर सदर आराेपी गाडीत बसल्यानंतर त्यांनी काही अंतरावर दारु पिण्यासाठी गाडी थांबवून चालकासही दारु पाजून ते पुन्हा निघण्याचे प्रयत्नात असताना त्यांना आराेपींनी चाकुचा धाक दाखवून हाताने मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांचे जवळील एक माेबाईल फाेन, एक माेबाईल टॅब, घडयाळ, लायसन्स, दाेन एटीएम व राेख रक्कम असा 16 हजार 500 रुपयांचा माल जबरदस्तीने चाेरुन नेत हाेते. दरम्यान अमाेल वर्पे हे घाबरुन गाडी चालु करुन रिव्हस घेत असताना आराेपी साेमनाथ पवार यास गाडीची धडक बसुन त्याचा डावा पाय माेडला. त्यामुळे त्यास चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे आराेग्यम हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत चाकण पाेलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...