आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दोघांच्या हल्ल्यात मित्राचा ओठ कापला, शिवीगाळ करत चाकूने हल्‍ला

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेटारसायकलची चावी हरवल्याने दाेन मित्रांनी मिळून एका मित्रास शिवीगाळ करत चाकूने त्याचा ओठ कापत जबर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींवर सिंहगड राेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वप्निल सुनील हराडे यांनी सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी मुकुंद राजगुरू आणि पंकज तावरे या आराेपींवर गुन्हा दाखल केला आहे. चेतन तिवारी (रा,.पुणे) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

हा प्रकार २८ ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेपाच वाजता हिंगणे परिसरात गायत्रीदेवी मंदिर डाेंगरावर घडला. स्वप्निल हराडे हा मित्र चेतनसाेबत दारू पिण्यासाठी गेला हाेता. तेथे मुकुंद राजगुरू व पंकज तावरेही बसले हाेते. त्या वेळी चेतन तिवारी याची दुचाकीची चावी हरवल्याने त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे मुकुंद राजगुरू व पंकज तावरे यांनी चेतन तिवारी याच्याशी वाद घालून त्याला चाकू मारून ओठ कापला.

बातम्या आणखी आहेत...