आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे भारती विद्यापीठात सार्वजनिक आरोग्यावर परिषद:आरोग्य विभागाचा चेहरा बदलणार - आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरामोहरा अत्याधुनिक तंत्रज्ञान व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा देऊन येत्या काळात बदलणार आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी (23 सप्टेंबर) येथे व्यक्त केले.

भारती विद्यापीठ वैद्यकिय महाविद्यालय कम्युनिटी मेडिसिन विभाग, बी.जे. वैद्यकिय महाविद्यालय कम्युनिटी मेडिसिन विभाग व इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनच्या 66 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन भारती विद्यापीठात करण्यात आले आहे. या परिषदेच्या उदघाटन समारंभात प्रा. सावंत बोलत होते.

यावेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, हेल्थ सर्व्हिसेसचे डायरेक्टर डॉ. नितीन आंबेकर, डॉ. जयश्री गोठणकर, डॉ. प्रकाश डोके, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. प्रसाद पोरे उपस्थित होते. यावेळी चंदीगड येथील डॉ.आर.डी. बन्सल यांना एच.सी.तिवारी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रा. सावंत पुढे म्हणाले, "नवरात्र हा शक्ती महोत्सव आहे नवरात्रीपासून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा उपक्रम राज्यभर राबवून महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग घरोघरी जाऊन कार्य करणार आहे. महिलांच्या विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी सुरवातीच्या काळात भारती विद्यापीठात दिलेल्या नोकरीमुळेच आज मी येथे उभा आहे."

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, " कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेसाठी गुंतवणूक करणे किती गरजेचे आहे हे कळाले. त्यावेळी सरकारने निर्णय घेऊन यासाठी मोठे काम केले. तंत्रज्ञान सतत बदलत आहे त्यामुळे या कॉन्फरन्ससाठी निवडलेला आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान हा विषय अतिशय समर्पक आणि गरजेचा आहे."

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी भारतभरातून सरकारी व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील पब्लिक हेल्थ विभागाचे 980 डॉक्टर्स उपस्थित आहेत. अशा परिषदेत चर्चा केलेल्या विषयांवर सरकारला आपली धोरणे ठरवताना उपयोग होतो.

बातम्या आणखी आहेत...