आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी आरोपींचा माग काढून केली अटक:कोयत्याच्या धाकाने कंत्राटदारांना लुटले

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोयत्याचा धाक दाखवून कंत्राटदारांना अडवून त्यांच्याकडील १८ हजारांची रोकड चोरणाऱ्या टोळक्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २८ जुलैला रात्री एकच्या सुमारास खडकीतील मुळा रस्ता सर्कल परिसरात घडली. सागर अशोक जगताप (३०), सुजित सुधीर म्हस्के (२७) शुभम राजेश कदम (२४), राहुल धर्मपाल यादव (२१), सतीश शिवकुमार यादव (३१, सर्व रा. खडकी) यांना अटक केली. रामचंद्र रतन शिंदे (४०, रा. पिसोळी, पुणे) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्याकडील १८ हजारांची रोकड, मोबाइल, पाकीट चोरून नेले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपींचा माग काढून अटक केली.

बातम्या आणखी आहेत...