आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्रातील पहिला काेराेनाग्रस्त ते पहिला कोरोनामुक्त; प्लाझ्मा देत दाेघांना जीवनदान

पुणे9 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • आत्मविश्वासाच्या बळावर काेरोनावर केली होती मात

सहलीनंतर दुबईहून पुण्यात परतलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीसह पत्नी, मुलगी व कारचालकाला ९ मार्चला कोरोनाचे निदान झाले होते. ते राज्यातील पहिले रुग्ण ठरले होते. काही दिवसांनी त्यांच्यासह कुटुंबही काेराेनामुक्त झाले. पुण्यातील ससून रुग्णालयात पहिल्या प्लाझ्मा थेरपीसाठी त्यांनी दाेन गंभीर जणांना प्लाझ्मा देत त्यांना जीवनदान दिले.

विकास कदम (बदललेले नाव) हे हिंजवडीतील एका कंपनीत काैशल्य विकासचे प्रशिक्षण देतात आणि देशभर ते कामानिमित्त प्रवास करतात. लग्नाला २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने प्रथमच पत्नीसाेबत परदेशवारीसाठी ते दुबईला गेले हाेते. तेथून परतल्यावर कोविड-१९ व्हायरससारखी लक्षणे दिसून आल्याने ते स्वत:हून रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीनंतर ते व पत्नी काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, धीर न साेडता त्यांनी नायडू रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत काेराेनावर मात केली.

कोरोनावर लस येईपर्यंत...

राज्यात सध्या कोरोना तपासण्यांची संख्या वाढल्याने काेरोना रुग्ण माेठ्या प्रमाणावर आढळत आहेत. घाबरून न जाता संकटावर मात करत जगण्यास आपण शिकले पाहिजे. पुढील काही काळ लस येईपर्यंत काेराेनासाेबत जीवन जगावे लागणार असल्याने त्यादृष्टीने सर्वांनी खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याची भावना कदम यांनी व्यक्त केली.

४१० मिली प्लाझ्मा दिला

विकास कदम म्हणाले, काेराेनामुक्तांच्या शरीरातील प्लाझ्मा अँटिबॉडीची गरज असल्याने ससून रुग्णालयाने माझ्याशी संपर्क केला. माझ्या रक्ताचे नमुने घेऊन प्रयाेगशाळेत पाठवले. नंतर ४१० मिली प्लाझ्मा घेतला. त्याचा वापर आयसीयूतील दाेन रुग्णांवर केला. त्याची मात्रा लागू पडली. नॉर्मल झाल्याने दाेन्ही रुग्णांचा आॅक्सिजन सपोर्ट काढण्यात आला. काेराेनाग्रस्तांसाठी आपण काहीतरी करू शकलाे याचे समाधान वाटले.

बातम्या आणखी आहेत...