आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देवदासींच्या मुलांसाठी पहिले वसतिगृह उभारणारे ज्येष्ठ सामाजिक मार्गदर्शक आणि विचारवंत प्रा. विलास वाघ (८२) यांचे कोरोना संसर्गामुळे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. पुरोगामी आणि आंबेडकरवादी विचारनिष्ठेचे पाईक, बहुजन समाजातील घटकांना परिवर्तनवादी विचारांचे भक्कम पाठबळ देत त्यांनी प्रबोधनाची धुरा खांद्यावर घेतली ती अखेरपर्यंत समर्थपणे सांभाळली. त्यांच्या पश्चात पत्नी उषाताई तसेच असंख्य कार्यकर्ते आणि ‘सुगावा’ मासिकाचा परिवार आहे. वाघ यांचा जन्म १ मार्च १९३९ रोजी धुळे जिल्ह्यातील मोराणे या गावी झाला.
त्यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून विज्ञानाची पदवी संपादन केली. १९७२ मध्ये त्यांनी सुरू केलेले सुगावा मासिक आजही सुरू आहे. बीएड केल्यानंतर ते पुण्यात आले. १९८६ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ सामाजिक कार्यात झोकून दिले होते.
विविध क्षेत्रात भरीव कार्य
वडावाडीत बालवाडी, देवदासींच्या मुलांसाठी पहिले वसतिगृह, राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष. समता शिक्षण संस्थेची स्थापना करून महिलाश्रम, वसतिगृहे,आश्रमशाळा, १९९४ मध्ये आपल्या मूळ गावी डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, १९९६ मध्ये सिद्धार्थ सह. बॅँकेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. दिल्ली दलित साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाउंडेशन, दया पवार स्मृती पुरस्कार आदींचे मानकरी होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.