आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे परिसरात २८० पेक्षा अधिक काेराेना रुग्ण झाले असून राज्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रुग्णालय येथे ७०० बेडची नवीन ११ मजली स्वतंत्र इमारत काेराेना रुग्णालय म्हणून साेमवारपासून कार्यान्वित झाली अाहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिशय वेगाने ही इमारत पूर्ण केली आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयित व बाधित रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात अाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ७०० पैकी ४७८ बेडची व्यवस्था पूर्ण करण्यात अाली अाहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात अवघ्या ३६ तासांत नवीन उच्च दाब वीज जोडणी देण्यात आली. महावितरणकडून नवी वीज यंत्रणा उभारण्याच्या सर्व कामांची जबाबदारी घेत या इमारतीसाठी ६०४ केडब्ल्यू वीजभाराची नवीन उच्च दाब वीज जोडणी करण्यात अाली.
अत्यावश्यक सेवा
ससून रुग्णालयात ४० व्हेंटिलेटरसह इतर अावश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी दिली. यामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
इमारतीमध्ये १३ हजार लिटर अाॅक्सिजन व्यवस्था
१३ हजार लिटर अाॅक्सिजन व्यवस्था या ठिकाणी बसवण्यात अाली अाहे. ५० अायसीयू अाणि ११ मजल्यावर वातानुकूलित ३०० टनांची व्यवस्था पाच दिवसांत कार्यरत करण्यात अाली अाहे. पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी चांगले हाॅस्पिटल उभे राहिले असून त्याचा फायदा सर्वांना हाेईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.